DA hike केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
हा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचारी आणि स्वायत्त संस्थांमधील कर्मचाऱ्यांसाठी लागू होणार आहे. विशेषतः ५वा आणि ६वा वेतन आयोग लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात ही वाढ होणार आहे.
सार्वजनिक उपक्रम विभागाने याबाबत अधिकृत निवेदन जारी केले आहे.
सहाव्या वेतन आयोगानुसार, पगारदार कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सध्याच्या २३९ टक्क्यांवरून २४६ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. ही सुधारणा १ जुलै २०२४ पासून लागू होणार आहे.
महागाई भत्त्यात ही ७ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. उदाहरणार्थ, जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार ४३,००० रुपये असेल, तर सध्याच्या २३९ टक्के महागाई भत्त्याने त्याचा पगार १,०२,७७० रुपये असे.
या नव्या वाढीनुसार, महागाई भत्ता २४६ टक्के होईल. यामुळे कर्मचाऱ्याचा पगार आता १,०५,७८० रुपये होईल. म्हणजेच, कर्मचाऱ्याच्या पगारात दरमहा सुमारे ३,००० रुपयांची वाढ होईल.
५व्या वेतन आयोगानुसार महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. सध्याचा महागाई भत्ता ४३३ टक्क्यांवर होता, तो आता ४५५ टक्क्यांवर नेण्यात आला आहे. यामुळे महागाई भत्त्यात १२ टक्के थेट वाढ झाली आहे.
७व्या वेतन आयोगानुसार केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि निवृत्तीधारकांना मिळणाऱ्या महागाई भत्ता आणि सवलतीतही वाढ करण्यात आली आहे. महागाई भत्ता ५० टक्क्यांवरून ५३ टक्के करण्यात आला आहे. ही वाढ १ जुलै २०२४ पासून लागू होईल.