मोठी बातमी: लाडक्या बहिणींनो! दिवाळी साजरी करा दणक्यात: सरकारची खूशखबर

Ladki Bahin yojana payment date 2024 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे आणि महिलांच्या खात्यात तिसऱ्या हफ्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील अनेक आदिवासी भागांतील महिलांनाही या पैशांमुळे फायदा होत आहे.

याच पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत लाडकी बहीण योजनेवर प्रतिक्रिया दिली.

नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं की, पुण्यात ग्रामीण भागात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आदिवासी भागातील महिलांना या पैशांचा उपयोग अनेक गोष्टींसाठी होत आहे.

महिलांनी या पैशांचा उपयोग स्वतःच्या प्रगतीसाठी करावा, असं आवाहन त्यांनी केलं. तसेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता ऑक्टोबरमध्येच देण्याची योजना असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्या पुण्यात लाडकी बहीण विजय संवाद यात्रा या कार्यक्रमात बोलत होत्या.

महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून जुलै 2024 पासून महिलांना आर्थिक मदत दिली जात आहे. या योजनेचा अनेक महिलांना लाभ मिळाला आहे.

ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये अर्ज केला होता, त्यांना जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचा लाभ मिळेल. ऑगस्टमध्ये अर्ज केलेल्या महिलांना एकूण तीन हजार रुपये देण्यात आले.

सरकारच्या नवीन नियमांनुसार, 1 सप्टेंबरपासून लाडकी बहीण योजनेकरता अर्ज करणाऱ्या महिलांना फक्त सप्टेंबर महिन्याचा लाभ मिळणार आहे.

ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज केला आहे, त्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे 3000 रुपये मिळणार नाहीत. त्यामुळे सप्टेंबरमध्ये अर्ज केलेल्या महिलांना केवळ 1500 रुपयेच मिळतील, अशी माहिती मीडिया रिपोर्ट्समध्ये देण्यात आली आहे.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक महिलांना 3000 रुपये मिळाले आहेत. मात्र, 1 सप्टेंबरच्या आधी अर्ज केलेल्या काही महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत.

अर्ज मंजूर झाल्यानंतरही काहींना योजनेचा लाभ मिळालेला नाही. आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक न झाल्यामुळे किंवा अर्जात काही चुका असल्यामुळे योजनेचा लाभ मिळाला नसावा. परंतु, ज्या महिला पात्र ठरल्या आहेत, त्यांना योजनेचे पैसे लवकरच मिळतील.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Close Visit agrinews