मोठी बातमी : पुढील 36 तासांत जोरदार पावसाचा इशारा: कोणत्या भागात होईल पावसाचा जोर, जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Rain Update 2024 : २५ ते २७ सप्टेंबर (बुधवार ते शुक्रवार) या तीन दिवसांमध्ये महाराष्ट्रात वीजा आणि गडगडाटासह जोरदार ते अतिजोरदार परतीच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात मात्र ही परिस्थिती रविवार, ३० सप्टेंबरपर्यंत कायम राहू शकते.

छत्तीस तास अति जोरदार पावसाचे १६ जिल्हे पहा

आज बुधवार, दि. २५ सप्टेंबरच्या रात्रीपासून ते दि. २६ सप्टेंबर (गुरुवार) च्या रात्रीपर्यंत म्हणजेच येणाऱ्या ३६ तासांत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई, उपनगर, ठाणे, पालघर, नंदुरबार, धुळे, नाशिक, नगर, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या १६ जिल्ह्यांमध्ये १२ ते २० सेमी पर्यंत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.

काही ठिकाणी २० सेमी पेक्षा जास्त पाऊस देखील पडू शकतो. विशेषतः मध्य महाराष्ट्रातील पर्जन्यच्छायेच्या भागात हा परतीचा पाऊस जास्त प्रमाणात जाणवेल.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Close Visit agrinews