सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. काही व्हिडिओ असे असतात की त्यातलं हास्य थांबवणं कठीण जातं, तर काही व्हिडिओ असे असतात की ते पाहून अंगावर काटा येतो. तुम्ही सोशल मीडियावर अनेक सत्य घटनांचे व्हिडिओ पाहिले असतील, जे थेट कॅमेऱ्यात कैद झालेले असतात. सध्या असाच एक वेदनादायक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहे.
काही लोक सापांसोबत खेळ दाखवतात, ज्यामध्ये जीवाला धोका असू शकतो. अशा खेळामध्ये धोका असतानाही लोक त्यातून मनोरंजन करतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला सापासोबत नाचताना दिसते, पण हा खेळ तिच्या जीवाला धोका पोहोचवणारा ठरतो.या प्रकारच्या व्हिडिओंवरून एक गोष्ट लक्षात येते की, अशा खेळांमुळे जीव धोक्यात येऊ शकतो.
व्हिडिओत नेमके काय?
व्हिडिओमध्ये एक स्टेजवर काही कलाकार डान्स करत असताना दिसत आहेत. त्याच स्टेजवर एक महिला देखील आहे, आणि तिथे काही सापही आहेत. स्टेज सुंदरपणे सजवलेले आहे. महिला डान्स करत असताना अचानक खाली पडते.
व्हिडिओच्या कॅप्शननुसार, तिला साप चावला असावा, त्यामुळे तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. तिची प्रकृती कशी आहे, याबाबत अद्याप माहिती नाही. त्यानंतर एक व्यक्ती बिनधास्तपणे हातात साप घेऊन उभा असल्याचेही दिसत आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म “एक्स” वर @arjunsaifai2002 या अकाऊंटवर शेअर केला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, असे प्रकार केल्यामुळे अनेकांचे जीव गेले आहेत, तरीही लोक असेच करत आहेत.
दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, लोक टॅलेंट दाखवण्याच्या नादात धोकादायक गोष्टी करतात आणि जीव गमावतात. या व्हिडिओचे नेमके ठिकाण मात्र अजून कळालेले नाही. तरीही, हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.