मोठी बातमी: गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या अॅम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट, व्हायरल व्हिडीओ

Ambulance Blast Video 2024 : जळगावमध्ये एक अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. एका गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या अॅम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट झाला, ज्यामुळे मोठा अपघात झाला. हा स्फोट इतका जोरदार होता की अॅम्बुलन्स जवळजवळ २० फूट दूर जाऊन पडली.

या घटनेत चालकाच्या तत्परतेमुळे गरोदर महिला आणि डॉक्टर यांचा जीव वाचला. चालकाने वेळीच सावधगिरी बाळगून त्यांना खाली उतरवले. ही घटना जळगाव शहरातील गुजराल पेट्रोल पंपाजवळ, मुंबई-नागपूर महामार्गावर घडली.

धरणगाव येथे एक गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या १०८ अॅम्बुलन्समध्ये अचानक ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट झाला. विशेष म्हणजे, हा स्फोट एका पेट्रोल पंपाजवळ झाला. अॅम्बुलन्स चालकाच्या समयसूचकतेमुळे रुग्ण, नातेवाईक, आणि डॉक्टरांचा जीव वाचला. स्फोट इतका तीव्र होता की अॅम्बुलन्सचे तुकडे झाले आणि वाहनाचे अवशेष हवेत उडाले. स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की आसपासचे लोक देखील घाबरले.

स्फोटाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, आणि अग्निशमन दलाला तात्काळ बोलावण्यात आले.

बुधवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोट एवढा जोरात झाला की अॅम्बुलन्स वीस फूट दूर फेकली गेली. चालकाच्या सावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला. आधी अॅम्बुलन्सला अचानक आग लागली, आणि त्यानंतर मोठा स्फोट झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, गाडीचे गिअर बदलत असताना अचानक आगीची ठिणगी दिसली. चालक राहुल बाविस्करला काहीतरी अडचण असल्याची शंका आली. त्याने त्वरित गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली.

त्यानंतर त्याने रुग्ण, डॉक्टर आणि नातेवाईकांना दुसऱ्या वाहनाने पुढे पाठवले. हे वाहन निघून गेल्यावर काही वेळातच अँब्युलन्समध्ये मोठा स्फोट झाला.

स्फोट इतका जोरदार होता की आसपासच्या वाहनांनाही जबरदस्त धक्का बसला. आग लागल्यानंतर जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या तीन-चार गाड्या घटनास्थळी आल्या. एक तासाच्या प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणण्यात आली.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Close Visit agrinews