मोठी बातमी : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंगणवाडी सेविकांसाठी मानधन वाढ GR येथे पहा

Anganwadi Workers Remuneration update : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

अंगणवाडी सेविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. तसेच, ज्या सेविकांनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले आहेत, त्यांना इन्सेंटिव्ह देखील दिला जाणार आहे.

आदिती तटकरे म्हणाल्या की, आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीचा प्रस्ताव ठेवला गेला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर सर्व मंत्र्यांनी या प्रस्तावाला समर्थन दिले आहे. मानधनात साधारण 50 टक्के वाढ करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ

महिला मदतनीसांना 3 हजार रुपये अधिक मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अंगणवाडी सेविकांना आता 10 हजार रुपये मिळत होते, त्यात आता 5 हजार रुपये वाढवले जात आहेत. मागील वेळी 3 हजार रुपये वाढवले होते, परंतु आता 5 हजार रुपये वाढवण्यात आले आहेत, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.

इन्सेंटिव्ह मिळणार आहे. त्यांनी सांगितले की, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे मानधन वाढवले गेल्याने आम्हाला आनंद झाला आहे. लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरलेल्या सेविकांना इन्सेंटिव्ह देणार आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि अजित पवार यांनी आमच्या मागणीला मान्यता दिली आहे.

ते अकाऊंट सिल होणार.

लाडकी बहीण योजनेचे पैसे पुरुषांच्या खात्यात जमा झाल्याचा मुद्दा समोर आला आहे. आदिती तटकरे यांनी सांगितले की, प्रशासनाच्या लक्षात ही बाब काल आली. त्या म्हणाल्या की, स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. 37 आणि 38 नंबरच्या अकाऊंट्सवर कारवाई केली जाईल आणि फॉर्म भरणाऱ्या व्यक्तींचीही तपासणी केली जाईल, ज्यामुळे कोणावर अन्याय होणार नाही.

आत्तापर्यंत 1 कोटी 87 लाख महिलांच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा झाले आहेत. काही कारणांनी ज्यांचे फॉर्म मागे राहिले होते, त्यांना तिन्ही महिन्यांचे पैसे मिळतील, आणि ज्यांना आधी 2 महिन्यांचे मिळाले होते, त्यांना या महिन्याचे पैसे दिले जातील, अशी माहिती त्यांनी दिली.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Close Visit agrinews