Heavy rain IMD update 2024 भारतीय हवामान खात्याने १५ नोव्हेंबरनंतर राज्यात जोरदार थंडी येईल, असा इशारा दिला होता. पण असं काही घडले नाही. १५ नोव्हेंबरला राज्यात १५ जिल्ह्यांमध्ये पाऊस होईल आणि हवा जोराने सुटेल. यामुळे वादळी वारा आणि विजांचा कडकडाट देखील होईल.
मोसमी पाऊस संपला आणि राज्यात थोड्याफार उशिराने गुलाबी थंडी सुरु झाली. पाऊस थांबला असला तरी, कधी कधी अवकाळी पाऊस होतच होता. दिवसा उबदार आणि रात्री हलकी थंडी जाणवायला लागली होती.
दिवाळीनंतर हवामानात मोठे बदल होऊ लागले होते. राज्यात तापमानात चढ-उतार सुरू झाला आणि हवेतील गारठाही वाढला. हवामान खात्याने सांगितले की, लवकरच थंडी अधिक तीव्र होईल, आणि त्यामुळे लोकांनी गरम कपड्यांची खरेदी सुरू केली होती.
राज्यात हिवाळा सुरू होईल, अशी अपेक्षा असतानाच अवकाळी पावसाने धक्कादायकपणे प्रवेश केला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. विशेषतः, शुक्रवार, १५ नोव्हेंबर रोजी काही जिल्ह्यांसाठी ‘येलो अलर्ट’ जाहीर करण्यात आले आहे.
गुरुवारपासून राज्याच्या दक्षिण भागापासून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कोकण, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, धुळे, नगर, पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर आणि विदर्भातील बुलढाणा, गडचिरोली, वाशिम, चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
हवामान खात्याने १५ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या काळात वादळी वारा, विजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे. आंध्रप्रदेश आणि तामीळनाडूमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. यामुळे दक्षिण किनारपट्टी भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांमध्येही वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस येण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, या काळात वारे ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहू शकतात.
राज्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता असतानाच, राज्यातील किमान तापमानात लवकर घट होत आहे. त्यामुळे, अवकाळी पावसाचे संकट असले तरी राज्यात थंडी पडणारच, हे किमान तापमानातील बदलावरून दिसून येते.