Ladki Bahin Yojana Scheme 2024 :मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरूवात झाली आहे. अनेक महिलांच्या खात्यात 4500 आणि 1500 रुपये जमा झाले आहेत, तर काही महिलांच्या खात्यात अद्याप पैसे आलेले नाहीत. त्यामुळे महिलांना प्रश्न आहे की बँकेत तिसरा हप्ता जमा होणार की नाही? योजनेचे पैसे खात्यात जमा झाले की नाही, हे तपासण्यासाठी आपण कसे पाहायचे ते जाणून घेऊया.
लाडकी बहीण योजनेंत तुम्ही अर्जात दिलेलं बँक खाते आधार कार्डाशी जोडलेलं असेल, तर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे, पहिले तुम्ही तुमचं बँक खाते आधार कार्डाशी जोडलेलं आहे का, ते पहा. जर खातं जोडलेलं असेल, तर तुम्ही ऑनलाईन बँकींग अॅपद्वारे खात्यात पैसे आले आहेत का, हे तपासू शकता. ट्रान्झॅक्शन हिस्टरीत जाऊन तुम्ही पैसे आले आहेत की नाही, ते पाहू शकता. तुम्ही बँकेत जाऊन देखील हे चेक करू शकता.
तुम्ही बँकेत जाऊन याबाबत माहिती विचारू शकता. बँक खात्याचे पासबुक अपडेट करूनही तुम्ही तुमच्याकडे पैसे आले आहेत की नाही ते तपासू शकता. सध्या व्हॉट्सअॅपचा वापर खूप वाढला आहे, त्यामुळे अनेक लोक फोनमधील मेसेज वाचत नाहीत. या मेसेजमध्ये तुम्हाला पैसे पाठवल्याचा संदेश मिळू शकतो. त्यामुळे या सर्व पद्धतींनी तुम्ही तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही, हे तपासू शकता.
तिसऱ्या हप्ता दरम्यान किती महिलांना लाभ मिळाला याची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. “माझी लाडकी बहीण” योजनेअंतर्गत तिसऱ्या टप्प्यात लाभ हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. २५ सप्टेंबर रोजी ३४,३४,३८८ महिलांना १५४५.४७ कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला, तर २६ सप्टेंबर रोजी ३८,९८,७०५ महिलांना ५८४.८ कोटी रुपयांचा लाभ मिळाला.
आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 सप्टेंबर रोजी 34,74,116 महिलांना 521 कोटी रुपयांचा लाभ दिला गेला आहे. ऑगस्ट महिन्यात लाभ मिळालेल्या महिलांना आता तिसरा हप्ता देण्यात आला आहे. तसेच, तांत्रिक अडचणींमुळे ज्यांना लाभ मिळाला नाही, त्यांना या वेळेस एकत्र तीन हप्ते (जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर) दिले जाणार आहेत.