Lion Vs Lion fighting video : सिंहाला जंगलाचा राजा मानले जाते. त्याची डरकाळी ऐकून संपूर्ण जंगल हादरते. पण वाघिणीचं सामर्थ्यही कमी नाही. तिची गर्जना ऐकली की सगळं जंगल गुंजतं. वाघ हा खूप ताकदवान आणि धोकादायक शिकारी आहे. आपल्या शिकाऱ्याला पकडण्यासाठी तो फारसा वेळ घेत नाही. त्यामुळे वाघाला जंगलातील सर्वात धोकादायक प्राणी मानले जाते.
तुम्ही सोशल मीडियावर प्राण्यांच्या लढाईचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. मात्र दोन वाघांमधील लढाई पाहिली आहे का? जर नाही, तर असाच एक थरारक व्हिडिओ समोर आला आहे. या लढाईतील प्रसंग पाहून कोणालाही अंगावर काटा येईल.
वाघ आपला प्रदेश दुसऱ्या वाघाला अतिक्रमण करू देत नाही, असे म्हणतात. त्यामुळे वाघाला त्याच्या हद्दीत इतर कोणाचा हस्तक्षेप खपत नाही. जर कोणी असा प्रयत्न केला तर वाघ आपापसात भांडायला लागतात.
सध्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये दोन वाघिणी एकमेकांशी जोरदार झुंज देताना दिसत आहेत.
फक्त 12 सेकंदांच्या या व्हिडिओत त्या दोघी एकमेकांवर हल्ला करताना दिसतात. त्यांच्या गर्जना ऐकून त्यांचा राग आणि लढाई किती तीव्र आहे, याची कल्पना येते.
लढाईच्या वेळी दोघींच्या गर्जना इतक्या जोरदार होत्या की त्याचा आवाज ऐकणाऱ्या कोणीही घाबरून जाईल.
महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील दोन वाघांच्या भांडणाचा जुना व्हिडिओ सध्या पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडिओत दोन वाघ जिवाच्या आकांताने लढताना दिसतात.
ते एकमेकांना मोठ्या ताकदीने पंजे मारतात, तसेच जोरदार लाथाबुक्क्यांचा वापर करतात. अखेर काही वेळानंतर ते आपले भांडण थांबवून वेगवेगळ्या दिशेला निघून जातात.
ही लढत जरी थोड्या वेळासाठी असली, तरी लोकांनी या व्हिडिओचा आनंद घेतल्याचे दिसते.