Vrial Video : समुद्राला कधीही हलक्यात घेऊ नये. समुद्राचे पाणी इतके अनिश्चित असते की लाटा कधी तुमच्याकडे येतील आणि तुम्हाला ओढून नेतील, हे कळणारसुद्धा नाही. त्यामुळे समुद्र किनाऱ्यावर जाताना नेहमीच सावध राहावे आणि स्वतःची काळजी घ्यावी, असा सल्ला दिला जातो.
आजपर्यंत अनेक मोठ्या बोटी देखील समुद्राच्या तडाख्याला बळी पडल्या आहेत. म्हणूनच समुद्र किनारी कधीही निष्काळजीपणा करू नये; अन्यथा ते जीवघेणे ठरू शकते. याचेच उदाहरण दाखवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
एकदा एका मुलीने आपल्या आईसोबत समुद्रकिनाऱ्यावर फिरायला जाण्याचे ठरवले. त्या दोघी समुद्राच्या किनाऱ्यावर निसर्गाचा आनंद घेत होत्या.
काही वेळ दोघींनी समुद्राच्या लाटांचा आस्वाद घेतला, मात्र अचानकच मोठ्या लाटा किनाऱ्यावर येऊ लागल्या. लाटांच्या वेगाने त्या आई-मुलीला समुद्रात खेचून नेण्याचा प्रयत्न केला.
आईने कसाबसा स्वतःला किनाऱ्यावर आणले, पण तिची मुलगी मात्र लाटांमध्ये वाहून जात होती, जणू मृत्यू तिला ओढून नेत होता.
आईला जगात देवासारखे मानले जाते. ती आपल्या सर्वांची काळजी घेत असते, पण गरज पडल्यावर तिने रौद्र रूपही धारण करणे शक्य आहे. सध्या व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये असाच एक प्रसंग घडतो.
या व्हिडिओमध्ये समुद्र किनारी असताना, एका आईने तिच्या मुलीला लाटांनी समुद्राच्या दिशेने ओढल्याचे पाहिले.
तेव्हा ती प्रसंगावधान राखून तात्काळ पुढे येते आणि तिच्या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न करते. शेवटी एक मोठी लाट किनाऱ्यावर येते आणि त्यासोबत मायलेकी किनाऱ्यावर सुरक्षितपणे पोहोचतात.
यानंतर इतर लोकही त्यांच्या मदतीला धावून येतात. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये दाखवलेली दृश्ये अनेकांना धक्का देणारी वाटत आहेत.
हा व्हायरल व्हिडिओ @viralinmaharashtra नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओवर ‘ओएमजी’ असे लिहिलेले आहे. व्हिडिओला बरेच लोक पाहत आहेत, आणि अनेक जण यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका व्यक्तीने लिहिले आहे, “असंच जवळ बसण्याची काय गरज होती? मेंदू गुडग्यात आहे काय!” तर दुसऱ्या व्यक्तीने लिहिले आहे, “फक्त आईच इतकं धाडस करू शकते.”