Shocking video : प्रत्येकाला गरमागरम चपत्या आवडतात, ज्यामुळे घरातील लोकांचे पोट चांगले भरते आणि प्रत्येकजण आनंदाने खातो. म्हणून अनेक गृहिणी नेहमी गरम चपात्या बनवतात. तसेच, मळलेले पीठ उरेल, तर ते रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले जाते. त्यामुळे ते खराब होत नाही आणि नंतर चपात्या करण्यासाठी वापरता येते. पण जर तुम्ही हे करत असाल, तर सावध राहा. गव्हाचे मळलेले पीठ रात्रभर फ्रीजमध्ये ठेवल्यावर, सकाळी ते कसे बदलते हे पाहिलं तर तुमचं आश्चर्य वाटू शकतं.
जर आपण पीठ प्लॅस्टिकच्या डब्यात किंवा भांड्यात ठेवून त्यावर फक्त ताट झाकले असेल, तर ती चुकीची पद्धत आहे. फ्रिजमध्ये अशा प्रकारे पीठ उघडे ठेवणे आरोग्यास हानिकारक ठरू शकते. अशा सवयीमुळे आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते, त्यामुळे ही चूक टाळणे गरजेचे आहे.
एका व्हिडिओमध्ये दाखवले आहे की, एका व्यक्तीने गव्हाचे मळलेले पीठ रात्रभर फ्रिजमध्ये ठेवले. सकाळी मायक्रोस्कोपखाली तपासणी केल्यानंतर त्या पिठामध्ये असंख्य सूक्ष्मजीव (किटाणू) आढळून आले. या सूक्ष्मजीवांमुळे आपण आजारी पडण्याची शक्यता वाढते.
ओल्या पिठामध्ये फर्मेंटेशनची प्रक्रिया (आंबण्याची प्रक्रिया) लवकर सुरू होते. या प्रक्रियेमुळे पिठात हानिकारक बॅक्टेरिया आणि रासायनिक घटक तयार होतात. असे पीठ आरोग्यास अपायकारक ठरते. त्यापासून बनवलेल्या चपात्या खाल्ल्यास पोटाशी संबंधित त्रास होऊ शकतो. त्यामुळे असे पीठ योग्य प्रकारे झाकून ठेवणे किंवा ताजे मळून लगेच वापरणे अधिक चांगले आहे.