चायनीज खाद्यपदार्थ खाण्यापूर्वी हा व्हिडीओ बघाच; पाहिल्यावर तुमची झोप उडेल, नागरिक संतापले! October 5, 2024 by Marathi Batmya Shocking vrial video:हल्लीच्या तरुण पिढीला चायनीज पदार्थांचे खूप आकर्षण झाले आहे. अनेक जण रस्त्याच्या कडेला असलेल्या हातगाड्यांवरचे हे पदार्थ आवडीने खातात. काही पदार्थ त्यांच्या खास चवीमुळे खूप लोकप्रिय होतात. मात्र, हे पदार्थ तयार करताना स्वच्छता राखली जाते का किंवा हातगाडीच्या आसपास स्वच्छता असते का, याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. असे पदार्थ बनवताना किंवा त्या भागात असलेल्या अस्वच्छतेबाबत अनेक व्हिडीओ आधीच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण, हे पदार्थ नेमके कुठे आणि कसे तयार होतात, याबद्दल आपल्याला माहिती नसते. असाच एक किळसवाणा व्हिडीओ अलीकडेच समोर आला आहे. आपण सगळेच नूडल्स आवडीने खातो, आणि बहुतेक लोक त्याचा आनंद घेतात. पण सध्या नूडल्स बनवताना एक विचित्र आणि अस्वच्छ गोष्ट समोर आली आहे. नूडल्समध्ये अशी काही आढळून आली आहे की, ते पाहिल्यावर तुम्हाला पुन्हा नूडल्स खाण्याची इच्छा होणार नाही. या व्हिडीओमध्ये आपण सुरुवातीपासून नूडल्स बनवण्याची प्रक्रिया पाहू शकता. लाकडी फळीवर नूडल्स पसरवलेले दिसतात, आणि त्यात मोठे किडे दिसून येत आहेत, ज्यामुळे कुणालाही अस्वस्थ वाटेल. धक्कादायक गोष्ट म्हणजे हेच नूडल्स लोकांना खायला दिले जात आहेत. त्या ठिकाणी सर्वत्र अस्वच्छता आहे. हे नूडल्स नंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या चायनीज गाड्यांवर जातात आणि तिथून आपल्या पोटात. हा व्हिडीओ पाहा आणि ठरवा की यापुढे नूडल्स खायचे की नाही. View this post on Instagram A post shared by sanDeep Singh (@sandeep_jalndhriya1984) इंस्टाग्रामवरील *sandeep_jalndhriya1984* या अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्यात कॅप्शनमध्ये “नूडल्समध्ये वर्म्स आढळले” असे लिहिले आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांमध्ये संताप उसळला असून, त्यांनी यावर विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा