मोठी बातमी : महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू करणार

Uniform Civil Law: भाजप राज्य करण्यासाठी नव्हे, तर विचारधारेवर काम करण्यासाठी सत्तेत आहे.त्यामुळे महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक जिंकल्यानंतर राज्यात समान नागरी कायदा लागू केला जाईल, अशी घोषणा भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी येथे केली.

त्याचवेळी २०२९ मध्ये महाराष्ट्रात भाजप स्वबळावर सत्तेत येणार असल्याचे सांगत भविष्यात स्वबळावरील वाटचालीचे स्पष्ट संकेतही त्यांनी दिले. दादर येथील योगी सभागृहात मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

मोठी बातमी डिसेंबर मध्ये खात्यात येणार ६१००/- रू. तुम्हाला मिळणार का पहा?

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, भाजपचे महाराष्ट्र प्रदेश निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव, सहप्रभारी अश्विनी वैष्णव, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, व्ही. सतीश, कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा, राज्याच्या निवडणूक व्यवस्थापन समितीचे प्रमुख रावसाहेब दानवे, राज्यातील भाजपचे सर्व खासदार, आमदार आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

अयोध्येत राम मंदिराची उभारणी, जम्मू- काश्मीरमधील ३७० हटवणे यासारखी कामे पार पाडण्यासाठी भाजप सत्तेत आला.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Close Visit agrinews